लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात; आठ मतदारसंघात १ कोटी ४९ लाख मतदार; १६ हजार ५८९ मतदान केंद्र

मुंबई, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 299 उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने 204 उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी  मनोहर पारकर, अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघामध्ये दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल होता. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवार, नामनिर्देशन पत्र व पात्र उमेदवारांची संख्या याबाबतचा तपशील  खालीलप्रमाणे.

 

क्रमांक व मतदारसंघ
उमेदवार
नामनिर्देशन
पात्र उमेदवारांची संख्या
अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या

05- बुलढाणा
29
42
25
21

06 – अकोला
28
40
17
15

07- अमरावती
59
73
56
37

08- वर्धा
27
38
26
24

14- यवतमाळ – वाशिम
38
49
20
17

15 – हिंगोली
55
78
48
33

16 – नांदेड
74
92
66
23

17 – परभणी
42
65
41
34

एकूण
352
477
299
204

 

दुसऱ्या टप्प्यातील  या आठ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय एकूण आठ जनरल निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक एकूण पाच आणि खर्च निरीक्षक एकूण 11 याप्रमाणे नियुक्त करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील या आठ लोकसभा मतदारसंघातील मतदारांची यादी दि. 4 एप्रिल रोजी अद्ययावत करण्यात आलेली असून माहिती खालीलप्रमाणे

 

अ.क्र.
मतदारसंघाचे नाव
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
एकूण
मतदान केंद्रे

1
05- बुलढाणा
9,33,173
8,49,503
24
17,82,700
1,962

2
06 – अकोला
9,77,500
91,32,69
45
18,90,814
2,056

3
07- अमरावती
9,44,213
89,17,80
85
18,36,078
1,983

4
08- वर्धा
8,58,439
8,24,318
14
16,82,771
1,997

5
14- यवतमाळ – वाशिम
10,02,400
9,38,452
64
19,40,916
2,225

6
15 – हिंगोली
9,46,674
8,71,035
25
18,17,734
2,008

7
16 -नांदेड
9,55,084
8,96,617
142
18,51,843
2,068

8
17 -परभणी
11,03,891
10,19,132
33
21,23,056
2,290

          एकूण
77,21,374
53,99,057
432
1,49,25,912
16,589

 

दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 23 जानेवारी 2024 पासून दिनांक 4 एप्रिल 2024 पर्यंत मतदार संख्येत झालेली वाढ खालीलप्रमाणे.

 

अ.क्र.
मतदारसंघाचे नाव
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
एकूण

1
05- बुलढाणा
9015
9634
0
18649

2
06 – अकोला
6837
8345
-5
15177

3
07- अमरावती
9734
11464
2
21200

4
08- वर्धा
7510
9342
2
16854

5
14- यवतमाळ – वाशिम
8509
12046
5
20560

6
15 – हिंगोली
6857
8283
2
15142

7
16 -नांदेड
11737
13434
7
25178

8
17 -परभणी
9453
10110
7
19570

          एकूण
69,652
82,658
20
1,52,330

 

वयोगटानुसार मतदार संख्या :

 

अ.क्र
मतदारसंघाचे नाव
18-19
20-29
30-39
40-49
50-59
60-69
70-79
80 +

1
05- बुलढाणा
26,456
3,58,287
4,17,453
3,74,282
2,79,626
1,78,329
95,559
52,708

2
06 – अकोला
29,202
3,78,171
4,28,893
3,97,314
3,09,685
1,94,905
1,03,421
49,223

3
07- अमरावती
17,387
3,24,021
4,15,054
3,89,500
3,25,684
1,97,303
1,08,159
58,970

4
08- वर्धा
25,154
2,92,544
3,58,141
3,72,703
2,92,529
1,84,486
1,02,577
54,637

5
14-यवतमाळ- वाशिम
28,167
3,92,554
4,38,361
4,11,484
3,22,862
1,95,166
10,28,82
49,440

6
15 – हिंगोली
28,628
3,97,508
4,29,814
3,78,496
2,73,277
1,67,326
89,223
53,462

7
16 -नांदेड
29,345
3,94,189
4,47,717
4,27,867
2,61,884
1,59,976
83,373
47,492

8
17 -परभणी
30,590
4,54,560
5,00,325
4,35,948
3,19,796
2,02,986
1,13,030
65,821

          एकूण
2,14,929
29,91,834
34,35,758
31,87,594
23,85,343
14,80,477
6,95,342
4,31,753

 दुसऱ्या टप्प्यातील इटीपीबीएसद्वारे मतदान करण्यास पात्र मतदारांची माहिती :

अ.    क्र.
क्रमांक व मतदारसंघ
मतदारांची संख्या

1
05- बुलढाणा
4,395

2
06 – अकोला
3,843

3
07- अमरावती
2,689

4
08- वर्धा
1,521

5
14- यवतमाळ – वाशिम
1,545

6
15 – हिंगोली
1,348

7
16 -नांदेड
1,689

8
17 -परभणी
1,441

 
एकूण
18,471

भारत निवडणूक आयोगाने 40 टक्के दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व 85 वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना 12-डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघात दि. 6 एप्रिलपर्यंत 85 वर्ष वयावरील 10 हजार 672 ज्येष्ठ नागरिकांचे तर  40 टक्के दिव्यांगत्व असलेले 3 हजार 555 दिव्यांग मतदारांचे त्याचप्रमाणे अत्यावशक सेवा या श्रेणीत 385 असे एकूण 14 हजार 612 अर्ज गृह मतदानासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 2 आणि पुणे विभागातील 7 व औेरंगाबाद विभागातील 2 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  यामध्ये 12 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून 19 एपिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. नामनिर्देशन पत्र छाननी दि 20 एप्रिल रोजी होईल तर 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे :

तिसऱ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील दि. 6 एप्रिल 2024 पर्यंत अद्ययावत मतदारांच्या संख्येचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.
मतदारसंघाचे नाव
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
एकूण

1
32-रायगड
8,19,454
8,46,664
4
16,66,122

2
35-बारामती
12,36,966
11,26,160
116
23,63,242

3
40-धाराशीव (उस्मानाबाद)
10,51,171
9,39,693
80
19,90,944

4
41-लातूर
10,33,648
9,39,896
61
19,73,605

5
42-सोलापुर
10,39,108
9,86,163
199
20,25,470

6
43-माढा
10,34,463
9,54,551
69
19,89,083

7
44-सांगली
9,51,364
9,13,115
112
18,64,591

8
45-सातारा
9,58,036
9,29,649
74
18,87,759

9
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
7,12,989
7,34,612
12
14,47,613

10
47-कोल्हापुर
9,82,573
9,49,344
90
19,32,007

11
48-हातकणंगले
9,24,404
8,86,738
95
18,11,237

एकूण
1,07,44,176
1,02,06,585
912
2,09,51,673

       तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 23 जानेवारीपासून दिनांक 8 एप्रिल 2024 पर्यंत मतदार संख्येत झालेली वाढ खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.
मतदारसंघाचे नाव
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
एकूण

1
32-रायगड
5,939
6,248
0
12,187

2
35-बारामती
24,329
22,942
3
47,274

3
40-धाराशीव(उस्मानाबाद)
7,985
8,492
2
16,479

4
41-लातूर
12,656
14,361
-2
27,015

5
42-सोलापुर
25,603
27,330
9
52,942

6
43-माढा
10,631
11,189
-6
21,814

7
44-सांगली
9,536
10,593
6
20,135

8
45-सातारा
9,469
10,117
7
19,593

9
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
4,502
4,639
1
9,142

10
47-कोल्हापुर
9,465
10,723
3
20,191

11
48-हातकणंगले
7,137
8,692
5
15,834

एकूण
1,27,252
1,35,326
28
2,62,606

             राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात दिनांक 5 एप्रिल 2024 पर्यंत राज्यातील वितरीत केलेले एकूण शस्र परवाने 78 हजार 99, जमा करण्यात आलेली शस्रास्रे 36 हजार 341, जप्त करण्यात आलेली शस्रे 195, परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली  शस्रे 721, परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे 14,792 तर राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी कायद्यांतर्गत 52 हजार 657 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यता आली आहे.

शासकीय अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यभरात 398.20 कोटींची जप्ती

         राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 5 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींची  जप्ती करण्यात आली. यामध्ये 38 कोटींची रोख रक्कम, 24.26 कोटींची 30 लाख 2 हजार 781 लिटर दारु, 207.45 कोटींचे 10 लाख 53 हजार 545 ग्रॅम ड्रग्ज, 55.10 कोटींचे 2 लाख 75 हजार 831 ग्रॅम मौल्यवान धातू, 42 लाखांचे 4 हजार 272 फ्रिबीज, 72.85 कोटींचे इतर साहित्य असे एकूण 398.20 कोटींची जप्ती करण्यात आली आहे.

दि. 16 मार्च  ते 7 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सीव्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 1900 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 99 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 14 हजार 623 तक्रारीपैकी 14 हजार 337 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियंत्रण समितीमार्फत 29 प्रमाणपत्रे

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या प्रि-सर्टीफिकेशनासाठी  नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 29 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

उमेदवारांना डमी मतपत्रिका वापरण्याची मुभा

उमेदवाराने त्याचे नाव व चिन्ह मतपत्रिकेत कोणत्या जागी येईल ही माहिती असलेल्या डमी मतपत्रिका छापून घेतल्यास, त्याला हरकत असणार नाही. मात्र, अशा डमी मतपत्रिकेवर अन्य उमेदवारांची नावे किंवा चिन्हे असता कामा नयेत. अशी डमी मतपत्रिका, खऱ्या मतपत्रिकेचा रंग तसेच आकार याच्याशी मिळती-जुळती असता कामा नये. तसेच, मतदारांच्या माहितीकरिता उमेदवार किंवा राजकीय पक्ष डमी बॅलेट युनिट तयार करु शकतात, असे डमी बॅलेट युनिट लाकूड, प्लास्टिक किंवा प्लाय बोर्ड बॉक्सचे असू शकतात. याबाबत सविस्तर तरतुदी उमेदवारांच्या हस्तपुस्तिकेत नमूद करण्यात आलेल्या आहेत, असेही श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी सांगितले.

००००

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *