मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!

नागपूर दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करीत ‘मिशन डिस्टींक्शन ‘यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

          स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने कळमेश्वर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच बाजार चौकात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कस्तुरबा गांधी विद्यालय अडम, अशोक विद्यालय उमरेड, विश्वव्यापी विद्यालय वेलतुर येथेही विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मतदार जागृती रॅली, पोस्टर स्पर्धा, मतदार जनजागृती शपथ अशोक विद्यालय उमरेड  येथे घेण्यात आली. पंचायत समिती हिंगणा अंतर्गत सातगाव येथे बचत गटाच्या महिलांनी होळीनिमित्त मतदान जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातही विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहेत. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन येत्या काळात करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *