अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

        मुंबई, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip)उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिली.

            मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत  श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी  मनोहर पारकर,अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

यावेळी श्री. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे 1,16,518 अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip)उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने 40% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व 85 वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना 12-डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्यभरातून दि. 28 मार्चपर्यंत 85 वयावरील जेष्ठनागरिक यामध्ये 17 हजार 850 मतदारांचे तसेच 40% दिव्यांगत्व असलेले 5 हजार 453 दिव्यांग मतदारांचे 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील 53 मतदारांचे 28 मार्च पर्यंत 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत.

            भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत  190अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या 241 एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे.

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पुर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे.सदर समितीकडे पूर्व प्रमाणिकरणासाठी (PRE CERTIFICATION) साठी  दोन राजकीय पक्षांचे दोन अर्ज प्राप्त झाले असून  कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती श्री.चोक्कलिंगम् यांनी यावेळी दिली. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यभरातील 48 लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम, दारु, ड्रग्ज इ. जप्त करण्यासाठी 1 हजार 656Flying Squad Team (FST) व 2096Static Surveillance Team (SST) स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक (Special General Observer) म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी श्री.धर्मेंद्र एस गंगवार व विशेष पोलिस निरिक्षक (Special PoliceObserver) म्हणून निवृत्त आयपीएसअधिकारी श्री.एन. के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे.  राज्यामध्ये या निवडणूकीसाठी 98 हजार 114 इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

        कायदा व सुव्यवस्थायंत्रणेमार्फत दि. 28 मार्च पर्यंत 27,745 शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत तसेच 190 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली 557 शस्रेजप्त करण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत 27,685 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती

        राज्यामध्ये दि. 1 ते 28 मार्च या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध  अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

     महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक19 एप्रिलरोजी मतदान घेण्यात येणार आहे.  या निवडणूकीसाठी  रामटेकमध्ये  एकुण 35 उमेदवार पात्र ठरले त्यापैकी 7 जणांनी माघार घेतल्याने अंतिम उमेदवारांची संख्या 28 आहे, नागपूर मध्ये अंतिम उमेदवार 26 आहेत, भंडारा-गोंदीया मध्ये 22 उमेदवारांपैकी 4 जणांनी माघार घेतली असून अंतिम उमेदवारांची संख्या 18 आहे,  गडचिरोली-चिमूर मध्ये 12 उमेदवारांपैकी 2 जणांनी माघार घेतली असून अंतिम उमदेवारांची संख्या 10 तर चंद्रपूर मध्ये अंतिम उमेदवार 15 आहेत.

पहिल्या टप्प्यात 05लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल

            निवडणूकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकास मतदार नोंदणीची प्रक्रीया थांबविण्यात येते व मतदार यादी अंतिम करण्यात येते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी दि. 27.03.2024 रोजी थांबविण्यात आली आहे व या निवडणूकीसाठी मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे अंतिम करण्यात आलेला आहे.

    मतदारांचा तुलनात्मक तपशील  या  पाच लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण पाच सर्वसाधारण निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच एकुण तीन पोलिस निरिक्षकांची आणि सहा खर्च निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

        पहिल्या टप्प्यातील पोस्टल बॅलेट (Electronically Transmitted Postal Ballet System (ETPBS) द्वारेमतदान करणाऱ्या मतदारांची एकुण संख्या  9 हजार 416 इतकी आहे यामध्ये रामटेक 1 हजार 867, नागपूर 1 हजार 001, भंडारा-गोंदिया 3 हजार 211, गडचिरोली-चिमूर 1 हजार 483 व चंद्रपूर 1 हजार 854 इतके मतदार पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहे.

लोकसभा निवडणूकीचा दुसरा टप्प्याबाबतची माहिती

            दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील 05आणि मराठवाडा विभागातील 03 अशा एकूण 08 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक26 एप्रिलरोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया 28 मार्च रोजी सुरु झाली असून 4 एप्रिल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र छाननी करण्यात येईल तर दि. 8 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

दुसऱ्या टप्प्यातील 08 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

मतदानासाठीपुढील 12 पैकीकोणताही एक ओळखीचा पुरावा आवश्यक

            आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड,बँक / पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र / राज्य सरकार / PSU / Public Limited कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार / MLC यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्र, अद्वितीय अपंगत्व आयडी (UDID)कार्ड, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, भारत सरकार.

सदर माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आलेली आहे.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *