जिल्हा नियोजन समितीच्या नवीन कार्यालयाचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील हस्ते उद्घाटन

बुलढाणा, दि. १५ : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांच्यासह जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ५ स्वतंत्र केबिन तसेच १० क्युबिकल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाज अधिक सुसूत्र, गतिमान आणि कार्यक्षम पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या कार्यालयाच्या बांधकाम व फर्निचरसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १ कोटी ५८ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सुविधेमुळे जिल्हा नियोजन समितीचे कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *