विधानपरिषद कामकाज

पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरांमध्ये ऑटो रिक्षा परमिटवर निर्बंधाचा विचार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई दि. ९ : राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ऑटो रिक्षा परमिटच्या संख्येवर निर्बंध घालण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत नवीन ऑटो रिक्षा परमिट देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ तसेच मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम, २०१९ मधील तरतुदीनुसार स्थानिक परिस्थितीचा विचार करून असा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कळविल्याचे त्यांनी सांगितले. विविध संघटनांच्या मागण्या व स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/वि.सं.अ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *