ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेता गुरुदत्त म्हणजे मानवी मनाचे कांगोरे हाताळणारे दिग्दर्शक – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. १९ : मानवी मनाचे कांगोरे हाताळणारे दिग्दर्शक म्हणून अभिनेता गुरुदत्त यांची ओळख होती, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

संवेदनशील अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले, मुंबई येथे आज एका सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम व नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी हजर होते.

या कार्यक्रमात ख्यातनाम गायक गायिका सरिता राजेश, सौम्या वर्मा, सर्वेश मिश्रा, ओंकार देवासकर, अमित काकडे, रिधीमा लाड इ. कलाकार सहभागी होते. रसिक प्रेक्षकांनी या सांगितिक कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *