मुंबई, दि. ३१ :- जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यपदी नियुक्तीसाठी इच्छुकांनी ddcahmumbai@gmail.com या मेलवर अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. शैलेश पेठे, उपायुक्त पशुसंवर्धन, (गुणनियंत्रण) तथा सदस्य सचिव जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी, मुंबई शहर जिल्हा यांनी केले आहे.
या समितीवर अशासकीय सदस्य पदासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील गोशाळा पांजरपोळ संस्थांचे अध्यक्ष, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे सदस्य, मानव हितकारक कार्य करणारे/प्राण्यांवर प्रेम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या नागरिकांना अर्ज करता येतील.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/