मुंबई, दि. २४: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थान, विधानभवन, रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा, बाळासाहेब भवन याठिकाणी विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर विधानभवनातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मनीषा कायंदे, रईस शेख, अमोल मिटकरी आदी उपस्थित होते.
मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुखांना जयंती दिनी अभिवादन केले. त्यानंतर कुलाबा येथील रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.
००००