राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना

मुंबई दि. 22 : अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारंभाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली.

राज्यपाल श्री. बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला.

राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी या मंदिराला भेट दिली होती.

साकळाई देवी व सागरमाता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवी मंदिर परिसरातच श्रीराम पंचायतन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

राजभवन देवी मंदिर समितीतर्फे यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांचा सत्कार करण्यात आला.

श्री राम पंचायतन स्थापना विधीला राज्यपाल बैस यांचे कुटुंबीय तसेच राजभवन संकुलातील निवासी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांनी मंदिर निर्माण कार्य करणाऱ्या श्रमिकांची भेट घेतली तसेच मंदिराची योग्य देखभाल ठेवल्याबद्दल राजभवन देवी मंदिर सदस्यांचे कौतुक केले.  

0000

Maha Governor performs consecration of Shriram Darbar in Raj Bhavan Complex

Maharashtra Governor Ramesh Bais performed the consecration of the Shri Ram Darbar in the Sri Gundi Mandir Complex in Raj Bhavan on Monday (22 Jan).

The consecration ceremony was organised to coincide with the consecration of the Shri Ram Temple in Ayodhya.

The Governor accompanied by his wife Rambai Bais performed the aarti alongwith his family members and the residents of Raj Bhavan complex.

Raj Bhavan has an ancient temple of Sri Gundi, also known as Sagar Mata and Sakalai. Prime Minister Narendra Modi had visited the renovated Sri Gundi Mandir in the Raj Bhavan premises during his visit on 14th June 2022.

The Governor and Smt Rambai Bais were welcomed and felicitated by the members of the Raj Bhavan Devi Mandir Committee.

The Governor and Smt Rambai Bais met the teams of construction workers of the temple and applauded the Raj Bhavan Devi Mandir Samiti for maintenance and cleanliness of the temple.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *