रस्ते विकास कामांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासावर भर : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक दि. 20 (जिमाका, वृत्तसेवा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गाव, तालुका, जिल्हा यांचा विकास करण्यात येत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील विकास कामांच्या माध्यमातून तालुक्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य (आदिवासी विकास) राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

आज दिंडोरी तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या ११३ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, उपअभियंता उमकांत देसले, सुधीर पवार, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांच्यासह सुनील बच्छाव, भाऊलाल तांबडे, सुनील पाटील, योगेश बर्डे, शामराव मुरकुटे, मनीषा बोडके, नरेंद्र जाधव, सुनील केदार, श्याम बोडके, सुरेश ढोकळे, योगेश तिडके व सबंधित गावाचे सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, तालुक्याच्या विकासासाठी रुपये ११३ कोटींच्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच यापुढे ही विकास कामे गतीने पूर्ण करण्यात येणार असून या विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचे ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

या कामांचे झाले भूमिपूजन….

रासेगाव ते तळेगाव रस्ता, पिंपळणारे ते तळेगाव रस्ता (अंदाजित किंमत 50 कोटी)
रासेगांव ते उमराळे चौफुली अंतर्गत विळवंडी कोचरगांव नाळेगांव राज्यमार्ग, हातनोरे इतर जिल्हा मार्ग २०६ ते ग्रामीण मार्ग ८० ला मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा, कोचरगांव प्रमुख जिल्हा मार्ग १८२ ते तिल्लोळी ला मिळणाऱ्या रस्त्याचे काम, रवळगांव ते नाळेगाव रस्त्याचे बांधकाम (अंदाजित किंमत 11 कोटी)
उमराळे चौफुली ते गोळशी फाटा अंतर्गत प्रमुख जिल्हा मार्ग ४३ ते श्रीरामनगर रस्ता, नळवाडपाडा ते चौधरीवस्ती कोकणगाव खु. रस्त्यावर लहान पुलाचे पोहचमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग ४३ ते श्रीरामनगर रस्त्यावर पुलांचे बांधकाम करणे (अंदाजित किंमत 65 कोटी)
गोळाशी फाटा ते ननाशी अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून एम.डी. आर-४३ वणी खुर्द ते शिवारपाडा कवडासर ननाशी रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग ४३ ते रामवाडी रस्त्याचे बांधकाम, प्रमुख जिल्हा मार्ग ४३ ते निळवंडीपाडा रस्ता, शिवारपाडा ते बाडगीचापाडा ग्रामीण मार्ग-६ वर पुलांचे बांधकाम करणे (अंदाजित किंमत 97 कोटी)
ननाशी ते भनवड अंतर्गत देवपूर ते भनवड ग्रामीण मार्ग-166, भनवड तळ्याचापाडा ते वैतागपाडा रस्त्यांचे बांधकाम करणे (अंदाजित किंमत 70 कोटी)
भनवड ते म्हेळुस्के अंतर्गत इतर जिल्हा मार्ग 63 ते उमराळे खुर्द ग्रामीण मार्ग 310, प्रमुख जिल्हा मार्ग 43 ते नळवाडी, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून लखमापूर ते कादवा म्हाळुंगी रस्ता, कादवा म्हाळुंगी ते आवनखेड रस्त्यांचे बांधकाम (अंदाजित किंमत 9 कोटी)
म्हेळुस्के ते कसबे वणी अंतर्गत कसबे वणी ते विश्राम पाडा ग्रामीण मार्ग 68 देव नदीवर पुलाचे बांधकाम, राजेवाडी ते जिरेवाडी ग्रामीण मार्ग ६८ व अहिवंतवाडी फाट्याजवळ लहान पुलाचे बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग 953 ते जिरेवाडी ग्रामीण मार्ग 68 लहान पुलाचे बांधकाम, प्रमुख राज्यमार्ग 27 चंडिकापूर ते गायकवाड वस्ती ग्रामीण मार्ग 32 रस्त्याची सुधारणा करणे, चौसाळे हस्ते पिंपरी अंशला कोल्हेरपाडा अहिवंतवाडी ते राज्य मार्ग 27 प्रमुख जिल्हा मार्ग 41 रस्त्यांची सुधारणा करणे, जुनी वणी ते सापुतारा रस्ता करणे या रस्त्यांचे बांधकाम करणे (अंदाजित किंमत 95 कोटी)
कसबे वणी ते मावडी चौफुली अंतर्गत ओतुर बाबापूर मुळाने ते राष्ट्रीय महामार्ग 953 प्रमुख जिल्हा मार्ग 47 यांची सुधारणा करणे (अंदाजित किंमत 17 कोटी)
मावडी चौफुली ते खेडगाव अंतर्गत खेडगाव शिंदवड या रस्त्याच्या सुधारणा करणे (अंदाजित किंमत 50 कोटी)
खेडगाव ते बोपेगाव अंतर्गत गोपेगाव (प्रमुख जिल्हा मार्ग 11 पासून) जोपुळ, खडकसुकेणे, मोहाडी, गणोरेवाडी, आंबेदिंडोरी खतवड तसेच रासेगाव ते राज्य महामार्ग 48 ला मिळणारा रस्ता(अंदाजित किंमत 50 कोटी)
बोपेगाव ते वरखेडा अंतर्गत ग्रामपंचायत ऑफिस राजापूर ते जॅकवेल ग्रामीण मार्ग 33 चे काँक्रिटीकरण करणे, तलाठी ऑफिस राजापूर ते झिरोपॉईंट पर्यंतचा प्रमुख जिल्हा मार्ग 47 चे काँक्रिटीकरण करणे (अंदाजित किंमत 3 कोटी)
वरखेडा ते दिंडोरी अंतर्गत दिंडोरी पालखेड जोपुळ पिंपळगाव प्रमुख जिल्हा मार्ग 29 या रस्त्यांची सुधारणा करणे (अंदाजित किंमत 17 कोटी)
दिंडोरी ते कोऱ्हाटे अंतर्गत कोऱ्हाटे गावठाण ते जगताप वस्ती या रस्ता करणे (अंदाजित किंमत 25 कोटी)
कोऱ्हाटे ते आंबेदिंडोरी अंतर्गत म्हसरूळ वरवंडी शिवनाई आंबे दिंडोरी जानोरी ते राज्य महामार्ग 37 ला मिळणारा प्रमुख जिल्हा मार्ग 35 ची सुधारणा करणे, ढकांबे आंबे दिंडोरी जानोरी ते राज्य मार्ग तीनची सुधारणा करणे, आंबे ते अमोल खोडे मळा रस्ता करणे (अंदाजित किंमत 75 कोटी)
आंबे दिंडोरी ते जानोरी अंतर्गत जानोरी ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग तीन राज्य मार्ग 37 चौपदरी रस्ता सुधारणा करणे (अंदाजित किंमत 50 कोटी)

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *