राजधानीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी अभिवादन

नवी दिल्ली, २६ : सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनच्या दर्शनी भागात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनच्या सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र परिचय केंद्रात माहिती अधिकारी अंजू निमसरकार  यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

0000

अंजु निमसरकर, माहिती अधिकारी – वृत्त विशेष 138

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *