नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ :  नूतन विभागीय आयुक्त  जितेंद्र पापळकर यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. सेवानिवृत्त होत असलेले विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी श्री पापळकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी नगरविकास विभागाचे सहआयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री पापळकर यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधत विभागातील माहिती जाणून घेतली.

नवनियुक्त विभागीय आयुक्त श्री. पापळकर हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हाधिकारी, धुळे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *