‘दिलखुलास’ कार्यक्रमात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

मुंबई, दि. ७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ५५१ वी रँक पटकावत उत्तीर्ण झालेले बिरदेव डोणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार ८, मे २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा- 2024 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत राज्यातून 90 हून अधिक उमदेवार उत्तीर्ण झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव सिद्धप्पा डोणे हे उत्तीर्ण झाले आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, विषयांची निवड व मुलाखतीची तयारी कशी करावी, तसेच या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे अभ्यास व तयारी केली याविषयी ‘दिलखुलास’ कायर्क्रमातून श्री. डोणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *