मुंबई, दि. १३ : मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता आर्टीकडून कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण, विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला तरूणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुगल लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे मातंग समाजातील हजारो तरुणांनी एकाच वेळी फॉर्म भरण्यास सुरुवात केल्यामुळे गुगल फॉर्म हँग होत असल्याच्या अडचणी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. भविष्यात अनेक उमेदवारांनी एकाचवेळी ऑनलाईन नोंदणी केली तरी अडचण येऊ नये यासाठी नोंदणी फॉर्मवर तांत्रिक विभागाचे काम सुरु आहे. लवकरच उमेदवारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरळीत होईल असे आर्टी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वारे यांनी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ/
The post आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार – व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे first appeared on महासंवाद.