मुंबई, दि. 2 : माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, प्रधानमंत्री अशा विविध भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अर्थशास्त्राशी संबंधित त्यांनी केलेले लिखाण नव्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल, त्यांचे कार्य देश कायम स्मरणात ठेवेल, अशा भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या.
00000
The post माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली first appeared on महासंवाद.