क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन

पुणे,दि. १: पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक  विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

मंत्री श्री. भरणे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आदी उपस्थित होते.

अनुयायांसाठी ज्या काही सुविधा आवश्यक असतील त्या भविष्यात करण्याच्या दृष्टीने राज्य शासन काम करेल, असेही श्री. भरणे यावेळी म्हणाले.

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून विजयस्तंभास  अभिवादन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकाळी विजयस्तंभास अभिवादन केले.

पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी समाधान व्यक्त केले.

0000

The post क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *