मुंबई, दि. ०४ : विधानसभा निवडणूक शांततेत व निर्भयपणे होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे केंद्रीय निवडणूक निरीक्षक शिल्पा शिंदे यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने आज विविध राजकीय पक्षांची बैठक मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीमती शिंदे बोलत होत्या. यावेळी मुंबादेवी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत भांडे पाटील उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक शिल्पा शिंदे यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व प्रतिनिधींशी या बैठकीत संवाद साधला. निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी मुंबादेवी मतदार संघातील मनुष्यबळ, ईव्हीएम, मतदान केंद्र, ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा,ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आदी संदर्भातील नियोजनाबाबत माहिती त्यांनी दिली.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
The post आदर्श आचारसंहितेचे पालन करावे – निवडणूक निरीक्षक शिल्पा शिंदे first appeared on महासंवाद.