निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा

मुंबई दि 29:- वर्सोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 164 मधील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला.

या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन श्री बाली यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री बाली यांनी यावेळी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी सादरीकरण केले.

——000——

केशव करंदीकर/विसंअ/

 

The post निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *