मुंबई, दि. २३: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाला केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मलबार हिल मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी कामकाजाविषयी माहिती दिली.
केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांनी कंट्रोल रूमची पाहणी करून आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमशी लवकरच त्या भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनकुमार पोतदार,सहायक खर्च निरीक्षक संजय गोरे, केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांचे संपर्क अधिकारी श्याम दडस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
The post मलबार हिल निवडणूक कार्यालयाला केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांची भेट first appeared on महासंवाद.