सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

The post सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *