डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.५ :अल्पसंख्याक विकास विभागामार्फत “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” सन २०२४-२५ मध्ये राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ यांचेकडे १५ सप्टेंबर, २०२४  पर्यंत सादर करावेत.

याबाबतचा अधिक तपशील महाराष्ट्र शासनाच्या https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर, २०२४ आहे. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले प्रस्ताव दि.१५ ऑक्टोबरपर्यंत शासनास सादर करतील, अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *