राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा 

उद्गीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती
नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारासही भेट

नांदेड, दि. 2  सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील उद्गीर येथे बुद्ध विहाराचा उद्घाटन कार्यक्रम 4 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.25 वाजता आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.35 वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उद्गीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील. बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित राहणार आहेत.

उद्गीर येथील कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.35 वाजता राष्ट्रपती महोदयांचे नांदेड विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी 4.45 वाजता नांदेड विमानतळ येथून वाहनाने गुरुद्वारा रोड, यात्री निवास रोड नांदेड येथे आगमन. सायं 5 ते 5.05 वाजेपर्यत टीबीसी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.5 ते 5.15 राखीव. सायंकाळी 5.15 ते 5.40 पर्यत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथे भेट.  सायं. 5.40 वाजता तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे वाहनाने प्रयाण. सायं. 5.55 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. त्यानंतर सायंकाळी 6.05 वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.

राष्ट्रपतींच्या  नांदेड येथील 4 सप्टेंबर 2024 रोजीच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. राष्ट्रपती महोदयांच्या नांदेड येथील दौऱ्यानिमित्त संबंधित विभागानी आपआपली जबाबदारी पूर्ण पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *