ससून डॉक येथील सामंजस्य करारानंतरची कार्यवाही, मरोळ मच्छीमार मार्केट विकासकामांचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २७ : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबईच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन मुंबईतील ससून डॉक येथे झालेल्या सामंजस्य करारानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तसेच मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

ससून डॉक परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी करण्यात येणाऱ्या विविध सुविधा, पायाभूत विकासकामे आणि सामंजस्य करारानुसार सुरू असलेल्या कामांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही आढावा घेण्यात आला.

मच्छीमार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना हॅन्ड ग्लोव्हज व गमबूट उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मच्छीमार समुदायाच्या दैनंदिन कामकाजात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावीपणे कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.

या बैठकीस  मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

मोहिनी राणे/स.सं

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *