मुंबई, दि. २८ :- श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या, डिझेल परतावा व जेट्टी कामांतील अडचणी सोडवण्यासाठी विभागाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
श्रीवर्धन तालुक्यातील मत्स्य व्यावसायिकांच्या समस्यांबाबत मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली या बैठकीस खासदार सुनील तटकरे यांच्यासह मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, छोट्या बोटींद्वारे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांच्या डिझेल कोट्याबाबत आणि ३० मे पर्यंत या बोटींद्वारे मासेमारी करण्याबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल. ड्रोनद्वारे करण्यात येत असलेल्या कारवाई बाबत कॅटेगिरी ठरविण्याबाबत ही विचार केला जाईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.
०००००
एकनाथ पोवार/स.सं