शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाकडून उद्या विशेष गीताचे लोकार्पण

मुंबई दि. २६ : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शनिवार, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे विशेष ‘शिवराज्याभिषेक गीता’ चे लोकार्पण होणार आहे. तसेच, शिवस्वराज्यगाथा या प्रेरक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रेरणेने विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले प्रेरक शिवराज्याभिषेक गीत ॲड. मृणाल भिडे यांनी रचले आहे.

अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांची संकल्पना आणि संयोजन असलेल्या या गीताच्या निर्मितीसाठी विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. यावेळी सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई निर्मित व प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ हा नवगीतांचा प्रेरणादायी सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश असेल. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *