विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना दिली शपथ

मुंबई, दि.१४: विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार रविंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

आज डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झीशान झिआउद्दीन सिध्दीकी, माधवी संजय नाईक, सुनिल विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थुजी भेंडे या १० सदस्यांनी शपथ घेतली.

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

००००

निलेश तायडे / वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *