लोककल्याणकारी व सामाजिक न्याय योजनांच्या प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

यवतमाळ,दि.२८ (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय विभागांमार्फत आयोजित पाच दिवसीय ‘यवतमाळ महोत्सवा’त जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा माहिती कार्यलयामार्फत ‘लोककल्याणकारी शासकीय योजनांचे आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्रकल्प अधिकारी अमित रंजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड आदी वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

या प्रदर्शनीच्या उद्घाटनानंतर पालकमंत्री ना. राठोड यांनी शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांच्या माहितीदर्शक इन्फोग्राफिकची पाहणी केले. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाविष्ट असलेल्या दिनदर्शिकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनीत जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण) अंतर्गत लोककल्याणकारी योजना व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना प्रदर्शित करण्यात आल्या आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या योजनांची माहिती मिळवून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. राठोड यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *