राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन

मुंबई दि, ३ : राष्ट्रपती  द्रौपदी  मुर्मू  यांचे  छत्रपती शिवाजी  महाराज  आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथे  भारतीय  वायू  सेनेच्या  विमानाने  दुपारी १.०५ वा. आगमन  झाले.

राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांनी  पुष्पगुच्छ  देऊन  राष्ट्रपती महोदयांचे  स्वागत केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील, मुंबई शहरचे  पालकमंत्री  दीपक  केसरकर, कौशल्य विकास मंत्री  मंगल  प्रभात  लोढा आदी उपस्थित होते. यावेळी व्हॉईस  अँडमिरल  अजय  कोचर, अतिरिक्त  सचिव राजेश  कुमार  मीना, मुंबई महानगरपालिकेचे  आयुक्त भूषण गगराणी, पोलीस  महासंचालक रश्मी  शुक्ला, मेजर  जनरल  विक्रमदीप  सिंह, एअर कमांडर  शाजी  पूनोरे,  पोलीस  आयुक्त  मुंबई  विवेक फणसळकर  यांच्यासह राजशिष्टाचार  व पोलीस  विभागाचे  वरिष्ठ अधिकारी  उपस्थित  होते.

विमानतळावरुन  राष्ट्रपती  महोदयांनी  चैत्यभूमी  येथे  पुढील  नियोजित कार्यक्रमासाठी  प्रयाण केले.

000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *