रायपूर (ता. हिंगणा) बाजारपेठ विकास प्रस्ताव तपासणीसाठी सचिव स्तरावर समिती गठीत करावी – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. २९ : नागपूर जिल्ह्यातील रायपूर (ता. हिंगणा) येथे BOT/PPP तत्त्वावर आधुनिक बाजारपेठ परिसर विकसित करून व्यावसायिकांना सर्व आवश्यक सुविधांसह दुकान गाळे उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी  ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात नागपूर जिल्ह्यातील रायपूर (ता. हिंगणा) येथे BOT/PPP तत्त्वावर आधुनिक बाजारपेठ परिसर विकसित करून व्यवसायिकांना सर्व आवश्यक सुविधांसह दुकान गाळे उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाबाबतची आढावा बैठक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचित केले.

बैठकीस आमदार समीर मेघे, सचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, सतीश चिखलीकर, सचिव (मुख्यमंत्री ग्राम सडक योजना), प्रशांत पाटील, उपसचिव (ग्रामविकास) तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) व इतर संबंधित अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. ग्राम विकास मंत्री गोरे यांनी सांगितले की, रायपूर (ता. हिंगणा) येथे BOT/PPP तत्त्वावर बाजारपेठ परिसर विकसित करून व्यवसायिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दुकान गाळे उभारण्याचा शासनाकडे प्राप्त झालेल्या या प्रस्तावाची सखोल तपासणी व छाननी करण्यासाठी सचिव (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी‌ या  समितीने प्रस्तावाची छाननी करून अहवाल सादर करावा. या समितीमध्ये सचिव (मुख्यमंत्री ग्राम सडक योजना) तसेच उपसचिव (बांधकाम-४) यांचा समावेश राहणार आहे.

सदर समितीने प्रस्तावाची तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक बाबींची सविस्तर तपासणी करून अहवाल सादर करावा. समितीच्या छाननीनंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी  दिले.

0000

वंदना थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *