मुंबई, दि. ३१ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ आज मुंबई येथे करण्यात आला.
मुंबई मॅरेथॉन जगातील सर्वात अधिक स्पर्धक असणारी समावेशक मॅरेथॉन झाल्याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले तसेच मॅरेथॉनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या सैन्य दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. डी एस कुशवाह, मॅरेथॉन आयोजक संस्था प्रोकॅमचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंह, सहसंचालक विवेक सिंह तसेच मॅरेथॉन प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
००००