‘मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस उत्साहात संपन्न

मुंबई, दि. २९ मार्च २०२६ : मॅक्ससिटी  लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस विविध विषयांवरील सखोल चर्चासत्रे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीरीत्या संपन्न झाला. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या सत्रांना दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

दिवसभरात मार्गदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, लिंग समानता, तसेच सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विविध मान्यवरांनी विचार मांडले. डॉ. आकाश खुराना आणि निशा दासगुप्ता यांनी मार्गदर्शन विषयावर चर्चा केली, तर टॉम कूपर यांनी “ऑपरेशन सिंदूर” या विषयावर धोरणात्मक विश्लेषण सादर केले.

“धुरंधर” या विषयावरील चर्चेत प्रकाश बेलावडी, कर्नल अशुतोष काले आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सशस्त्र दलांचा दृष्टिकोन मांडला. लिंग ओळख विषयावरील सत्रात नुसरत जाफरी, किरण मन्राल आणि शुनाली खुल्लर श्रॉफ यांनी सहभाग घेतला.

अमेरिका–इराण संबंधांवरील चर्चेत राजदूत टी.सी.ए. राघवन, मिन्हाज मर्चंट आणि प्रबळ दासगुप्ता यांनी सखोल विश्लेषण केले.

“भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास” या सत्रात या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी यांनी सहभाग घेत भारतीय सभ्यतेचे सातत्य  आधारांवर प्रकाश टाकला.

फेस्टिव्हलचा समारोप सागरातील जीवनावरील सत्राने झाला. तसेच, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे कलाकार वंदना कृष्णा यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या सत्रांमुळे मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हल हे संवाद, विचार आणि ज्ञानविनिमयासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.यामध्ये विद्यार्थी लेखक साहित्यिक मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *