मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत माण-खटाव तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भातील आढावा बैठक संपन्न

सातारा, दि. ४: माण-खटाव तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात दहिवडी, ता. माण येथे आज ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, टंचाईग्रस्त गावांमधील उपाययोजना तसेच नागरिकांना अखंड व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, आणि संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *