भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. १४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, सभापती विधानपरिषद यांचे सचिव पंडित खेडकर, उपसभापती यांचे खासगी सचिव अविनाश रणखांब, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *