फोर्ट मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यावे आयोजन

मुंबई, दि.९ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व सिद्धार्थ कॉलेज याच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ जुलै, २०२६ रोजी सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, बुद्ध भवन, फोर्ट, मुंबई येथे सकाळी ९:३० ते दुपारी ३:०० या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यामध्ये मुंबईतील नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदासह उपस्थित राहून त्याच ठिकाणी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड करणार आहेत. तसेच शासनाचे विविध महामंडळामार्फत कर्जाच्या सवलतीची माहिती दिली जाणार असून त्यातून उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी लाभ घेता येईल, असे आवाहन मुंबई शहरचे कौशल्य विकास सहायक आयुक्त यांनी केले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *