पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून नाट्यगृहाच्या कामाची पाहणी

लातूर, दि. १५: पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृह इमारतीच्या कामाची पाहणी केली. तसेच उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता दिपक टेकाळे, उपअभियंता राजेंद्र बिराजदार यावेळी उपस्थित होते.

नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी निविदा प्रक्रिया तत्काळ करून लवकरात लवकर कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी. नाट्यगृहाची क्षमता वाढविणे, अद्ययावत सोयी सुविधांची निर्मिती यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी निधी दिला जाईल. मात्र, लातूरच्या नाट्य परंपरेला आणि वैभवला साजेसे अद्ययावत, आधुनिक नाट्यगृहाचे काम व्हावे, असे पालकमंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *