पाटण आगाराच्या १३ नवीन एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा दि .१४ – पाटण आगाराला मिळालेल्या १३ नवीन जिजाऊ एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
या नवीन १३ बसमुळे पाटण आगाराच्या बसची संख्या आता ६० इतकी झाली आहे. यामुळे पाटण सारख्या दुर्गम भागातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे. या बस मुख्यतः सातारा आणि कराड मार्गावर धावणार आहेत.
यावेळी विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांच्यासह पाटण नगरपंचायतीचे सदस्य, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पाटण पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *