दुर्लक्षित महिला व त्यांच्या बालकांकरिता विशेष शिबिराचे आयोजन 

मुंबई, दि. २४ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘प्रेरणा स्वयंसेवी संस्था’ यांच्या सहकार्याने वेस्ट खेतवाडी महापालिका शाळा, पाचवी लेन, ग्रँट रोड, कामाठीपुरा येथे समाजातील दुर्लक्षित महिला वर्ग व त्यांच्या बालकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये आधार नोंदणी, सेतू केंद्रामार्फत विविध दाखले, शिधापत्रिका नोंदणी, मतदार नोंदणी, आरोग्य तपासणी केंद्र, संजय गांधी निराधार योजना तसेच कामगार कल्याण योजना आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिबिरादरम्यान कामाठीपुरा परिसरातील महिलांची व त्यांच्या बालकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. बालकांची नवीन आधार नोंदणीही करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा अभाव ही मोठी समस्या असल्याचे यावेळी समोर आले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना संबंधित महिलांना शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

000

संजय ओरके/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *