‘दिलखुलास’ कार्यक्रमात सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिवस व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

मराठी भाषा विभागामार्फत भाषा संवर्धन, प्रसार आणि प्रशासनात मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. साहित्य, संशोधन, भाषांतर, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी अधिक समृद्ध करण्यावर विभाग भर देत आहे. नव्या पिढीत मराठी भाषेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी यासाठी स्पर्धा, कार्यशाळा आणि विविध जनजागृती उपक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. या मुलाखतीत मराठी भाषेचे जतन-संवर्धन आणि प्रसारासाठी नागरिकांचा सहभाग तसेच समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत मराठीचे महत्त्व पोहोचविण्यासाठी विभाग करत असलेले प्रयत्न, याविषयी सचिव डॉ. कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही विशेष मुलाखत गुरुवार 19, शुक्रवार 20, शनिवार 21 आणि सोमवार 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून ‘News On AIR’ मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *