‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पावर उद्या विशेष मुलाखत

मुंबई, दि. २८ : राज्यातील महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या गरजा, आकांक्षा आणि त्यांच्या कल्याणाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून या सर्वांच्या सक्षमीकरणावर  प्रामुख्याने भर देण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सांगितले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, दि. 29 जून 2024, तसेच सोमवार, दि. 1 आणि मंगळवार, दि. 2 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि.29 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *