‘दिलखुलास’मध्ये सहायक आयुक्त सचिन साळे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीतून समाजकल्याण विभागाच्या विविध योजना, कार्यपद्धती आणि लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, दिव्यांग आणि तृतीयपंथी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतिगृह सुविधा, निर्वाह भत्ता आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली यांसह दिव्यांग व्यक्तींसाठी शैक्षणिक सहाय्य, आर्थिक मदत, स्वावलंबनाच्या योजना तसेच तृतीयपंथी घटकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ कसा घ्यावा, अर्ज प्रक्रिया काय आहे आणि पात्रता निकष कोणते आहेत, याबाबत सहायक आयुक्त साळे यांनी मार्गदर्शन केले.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही विशेष मुलाखत शुक्रवार 27, शनिवार 28 फेब्रुवारी 2026 आणि सोमवार 2 मार्च 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत News On AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येणार आहे. ही मुलाखत सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

00000

जयश्री कोल्हे-महाले/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *