जनगणना २०२७ प्रक्रिया १ मे पासून सुरू; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे, दि. १ : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला आज, १ मे २०२६ पासून राज्यभर प्रारंभ होत असून नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगर विकास व परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी केले. पोलीस कवायत मैदान येथे त्यांनी महाराष्ट्र दिनाचे राष्ट्रध्वजवंदन करून मानवंदना दिली. त्या प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

समारंभाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक व ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त, तसेच संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचे नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

जनगणना २०२७ संदर्भात त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना केली जाणार असून १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील असे सांगून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.

समाजाच्या प्रगतीत शेतकरी, कामगार, शिक्षक आणि युवक यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून सामाजिक समता, बंधुता आणि न्याय यांची जोपासना करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांचा सन्मान, बालकांचे संरक्षण आणि वंचित घटकांचा विकास हीच खरी प्रगती असल्याचे त्या म्हणाल्या. पर्यावरण संवर्धनासाठी पाणी, वृक्ष आणि मातीचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार भिमराव तापकीर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा उप निवडणूक अधिकारी मिनल कळसकर याच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

२०२५ चे विशेष सन्मानचीन्ह प्राप्त पोलीसांचा केला गौरव

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी पुढील पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह – २०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
अपर पोलीस आयुक्त श्री. बसवराज तेली, सपोआ श्री. विशाल शामराव हिरे, पोलीस उप अधीक्षक श्री. चंद्रकांत महादेव कुटे, पोनि-पोउप अधीक्षक श्रीमती जयश्री रामचंद्र चिवडशेट्टी, पोलीस निरीक्षक श्रीमती. माधुरी चंद्रकांत भोसले, सपोनि श्री. प्रविण शिवहर स्वामी, सहा. पोउपनि श्री. कुलदिप दत्तात्रय संकपाळ, श्री. सचिन नाथाराम लोंखडे, पोउपनि श्री. जगदेवप्पा इरन्ना पाटील, श्री. दत्तात्रय चंद्रकांत पवार, मसहापोउपनि श्रीमती विजया शिवाजी खुटवड, सहापोउपनि श्री. प्रदिप मनोहर भावसार, श्री. राजेंद्र आक्काप्पा कोणकेरी, श्री. दिपक अर्जुन महाजन, श्री. विनोद श्यामराव भोकरे, श्री. सुहास मुरलीधर पवार, श्री. महेश जानकु बनकर, श्रीमती दिपाली सुदर्शन कहडणे, श्री. रुस्तम इसाक मुजावर, श्री. प्रविण ज्ञानदेव शिंदे, श्री. रघुनाथ यशवंत वाघमारे, श्री. रोहीदास हरि मुसळे, श्री. अनिल कृष्णा दांगट, श्री. सोमनाथ दिगंबर वाघचौडे, श्री. समाधान भरत बिवितकर, श्री. तुकाराम पंढरीनाथ भेगडे, श्री. सुनिल भानुदास जगताप, म.पो.हवा श्रीमती वैशाली योगेंद्र जाधव, श्रीमती शुभदा राजेश पोतनीस, पोहवा श्री. राहुल दत्तात्रय पवार, श्री. आश्रुबा चांगदेव मोराळे, श्री. सलीम इन्नुस तांबोळी, श्री. रामदास निवृत्ती गोणते, श्री. निलेश सोपान परवते, श्री. दयाराम दादाराव शेगर, श्री. शंकर बाबुराव कुंभार, श्री. सुजित महादेव पवार, श्री. अमोल परशुराम पिलाणे, श्री. सदोबा आप्पाराव भोजराव, श्री. रुपेश शिवाजी पवार, म.पो.हवा श्रीमती सलोनी परमेश्वर फुंदे, पोहवा श्री. सुनिल फकीरप्पा बनसोडे, श्री. महेश बबन भुजबळ, श्री. मनोज महादेव पाटील, श्री. संतोष पोपट शिंदे, इब्राहिम अरभावी, मपोशि श्रीमती यामिणी उमेशराव ठाकरे, श्रीमती प्रगती रामहरी ठोबरे, श्रीमती दिव्या प्रभाकर कुंभार.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *