उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई, दि. 21 : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे, पार्थ अजित पवार, जय अजित पवार उपस्थित होते.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *