आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

मुंबई, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भेट घेतली. पवन कल्याण यांच्यावर सध्या या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या उजव्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवन कल्याण यांना लवकरात लवकर पूर्ण आराम मिळून ते बरे व्हावेत, अशा सदिच्छाही व्यक्त केल्या.

0000

निलेश तायडे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *