मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
पूरपश्चात व्यवस्थापन तातडीने करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : कोयना व वारणा धरणातील पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीने इशारा पातळी…
मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबाच्या छाननीसाठी मानक दरसूची जाहीर
मुंबई, दि. २३:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यातर्फेलोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीउमेदवारांनी केलेल्या…
रत्नागिरी पोलिसांची ‘डिजिटल’ भरारी
प्रशासनात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम यांमुळे रत्नागिरी पोलीस दलाने राज्याच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण…