शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे आवश्यकतेनुसार पुरवठ्याचे नियोजन करा – विजयलक्ष्मी बिदरी

शेतकऱ्यांसाठी च्या युरियाचा औद्योगिक वापरावर निर्बंध
तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देणार
विभागात 100% पेरणीचे लक्ष

नागपूर, दिनांक. १५ : विभागात खरीप पिकाखाली 18 लक्ष 95 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप पिकांचे नियोजन करताना भात, सोयाबीन, कापूस व तुर या पिकासह तेलबिया पिकांच्या नियोजनाला प्रोत्साहन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहे. खरीप पिकांचे नियोजन करताना शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे खते तसेच विविध बँकांद्वारे कर्ज पुरवठा आवश्यकतेनुसार उपलब्ध होईल, यासाठी  जिल्हास्तरावर नियोजन करावे, अशा सूचना श्रीमती बिदरी यांनी दिले आहेत.

विभागातील खरीप नियोजना संदर्भात आढावा बैठक विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच महसूल सहकार आदी विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पुनर्वसन सह आयुक्त श्रीमती विजया बनकर, विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखडे, कृषी सहसंचालक उमेश घाडगे तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागात 23 लाख 12 हजार लागवडीखालील क्षेत्र असून त्या अंतर्गत 18 लाख 25 हजार हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनामध्ये भंडारा-गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात 33 टक्के जास्त भात लागवडीचे क्षेत्र आहे, तर 44 टक्के क्षेत्रात कापूस, 14 टक्के क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली जाते.

विभागात मागील वर्षी 113% सरासरी पाऊस झाला होता, तर खरीप हंगामात 103% पेरणी पूर्ण झाली होती. विभागात कापूस व सोयाबीन तसेच तुरीच्या पिकासोबतच तेल वर्गीय पिकांचा पिकांच्या क्षेत्रात वाढ व्हावी, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना करताना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, भात क्षेत्रात तेलबिया पिकांचा समावेश कसा करता येईल या दृष्टीने नियोजन करावे.

खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाखाली दोन लाख 61 हजार हेक्टर कापूस पिकाखाली 68 लाख हेक्टर तर तुरीच्या अंतर्गत एक लाख 87 हजार क्षेत्रात नियोजन करण्यात आले आहे. खरीप बियाण्यांमध्ये साधारणत: दोन लाख 37 हजार 354 क्विंटल ची गरज असून महाबीज व इतर खाजगी कंपन्यांकडे पुरेसे बियाणे उपलब्ध आहे. खतांचाही मागणी नुसार पुरवठा उपलब्ध होत असून युरिया व डीएपी खतांचा संरक्षित साठा असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी यावेळी सांगितले.

हवामान विभागाच्या सूचनेनुसार विभागात केवळ 92 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दोन पावसातील खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पिकांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. अल निनोचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापूस पिकाची लागवड करताना सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करावा, तसेच सोयाबीन साठी बीबीएफ सरीवरंबा पद्धतीनेच पेरणी करावी भात पिकाची पेरणी करताना डी एस आर व एस आर आय पद्धत वापरावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येण्यात येत आहे.

खतांचा काळाबाजार थांबवण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करावी, तसेच युरियाचा औद्योगिक वापरासाठी उपयोग होत असल्याचे आढळून आल्यामुळे प्रत्येक दुकानांची तपासणी करून काढावा बाजार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. औद्योगिक क्षेत्रात युरियाचा वापर होत असलेल्या उद्योगांची तपासणी करून उपलब्ध असलेले युरिया यांचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवावे, असे निर्देशही विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिलेत.

प्रारंभी कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी विभागातील खरीप हंगामातील विविध पिकांच्या नियोजनाची माहिती दिली शेतकऱ्यांना खरीप कर्ज पुरवठा बियाणे व खतांच्या मागणीनुसार पुरवठ्यासाठी कृषी विभागासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय करण्यात येत असून खतांचा व बियाण्यांच्या काळात बाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *