लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंतांना साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई, दि. १८: साहित्य अकादमीच्या आज जाहीर झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये मराठी साहित्यातील दोन साहित्यिकांचा समावेश आहे. लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ तर कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे.

लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीने मराठी साहित्यातील युवा लेखकांच्या संवेदनशील आणि प्रभावी लेखनाची चुणूक दाखवली आहे. तर कवी सुरेश सावंत यांचा ‘आभाळमाया’ हा कवितासंग्रह बाल साहित्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा दाखला आहे.

मराठी साहित्याच्या क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या प्रदीप कोकरे आणि सुरेश सावंत यांचे या यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन करतानाच त्यांच्या साहित्य प्रवासाला यश मिळो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *