महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्य दिन उत्साहात; निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली, 15 : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन आज राजधानी नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या पथकाने यावेळी शिस्तबद्ध पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी डॉ. सिंघल यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास  निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड,महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनचे सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. गंगवार, लेखा अधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सारिका शेलार, प्रियंका नागे, सुरक्षा सहाय्यक अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह  नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी- कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *