मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

नाशिक, येवला, दि.२३ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन  भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील ७७ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये रस्ता काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा, सभामंडप यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. ही सर्व विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच.बी.चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील या विकासकामांचे झाले भूमिपूजन

येवला शहरातील बादापूर रोड भागातील बदापूर रोड ते साईबाबा मंदिर पाठीमागील बाजू पावतो रस्ता कॉंक्रिटीकरण व भूमिगत गटार करणे कामाचे भूमिपूजन (र.रु. २५ लक्ष)

येवला शहरातील पारेगाव रोडवरील स. नं. १०६ /११  दत्तमंदिराजवळ सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन (र.रु.२० लक्ष)

येवला शहरातील पारेगाव रोड येथे दत्त मंदिराजवळ व्यायाम शाळेचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.१० लक्ष)

येवला शहरातील विशाल परदेशी यांच्या घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण करणे (र.रु. २२ लक्ष)

00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *