पद्म पुरस्कारांकरिता शिफारस करण्यासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

मुंबई, दि.२४ : विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2027 रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी व्यक्तींची नावे केंद्र शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भातील शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

ही समिती विविध माध्यमांतून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासनास करेल.

०००००

बी.सी.झंवर/वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *