नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ‘गट-ड’ भरतीची निवड यादी प्रसिद्ध; लवकरच होणार समुपदेशन

मुंबई, दि. १७ : ​नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ‘गट-ड’ संवर्गातील २८४ पदांच्या भरती प्रक्रियेतील अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आता नियुक्तीपूर्वी समुपदेशनासाठी  बोलविण्यात  येणार आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात रिक्त असलेल्या २८४ पदांसाठी जुलै २०२५ मध्ये आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर, गुणवत्ता आणि सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली होती.

उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीअंती निवड यादी व प्रतीक्षा यादी,निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादी दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 

समुपदेशन प्रक्रिया

निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. या समुपदेशनासाठीचा दिनांक आणि ठिकाण लवकरच विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *